आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे चौदावे राष्ट्रपती म्हणून शनिवारी निवड झाली आहे. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. विद्यमान राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांच्या जागी आता झरदारी हे राष्ट्रपती असतील. झरदारी यांचे प्रतिस्पर्धी महमूद खान अचकझाई हे सुन्नी इत्तेहाद परिषदेचे उमेदवार होते. झरदारी यांना 255 मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 119 मते मिळाली.
पाहा पोस्ट -
Asif Ali Zardari elected as 14th Pakistan President
Read @ANI Story | https://t.co/w5qiWX9tqu#Pakistan #AsifAliZardari #PakistanPresidentialElections pic.twitter.com/86WsADBnZs
— ANI Digital (@ani_digital) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)