Oxford Word Of The Year 2024: सध्या ‘ब्रेन रॉट’ ही संज्ञा चर्चेत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डिजिटल कंटेंट, सोशल मीडिया किंवा इतर मनोरंजन कंटेंटवर जास्त वेळ घालवते व त्यानंतर त्याची मानसिक क्षमता, लक्ष आणि विचारशक्ती कमी होते, याला प्रकाराला ‘ब्रेन रॉट’ म्हणतात. याकडे सामान्यतः डिजिटल किंवा मानसिक थकवा म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. आता 'ब्रेन रॉट' हा ‘ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024’ म्हणून निवडला गेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. वर्ड ऑफ इयरच्या यादीमध्ये ब्रेन रॉट, डेम्युअर, डायनॅमिक प्रायसिंग, लॉर, रोमान्स आणि स्लॉपसह 6 शब्दांचा समावेश आहे. हे सर्व शब्द 2024 मध्ये झालेले सामाजिक बदल आणि ट्रेंड दर्शवतात. ऑक्सफर्डने 2023 मध्ये ‘रिझ’ची निवड केली होती. 2024 मध्ये इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्मवर ब्रेन रॉट’ या शब्दाच्या लोकप्रियतेत 230% वाढ पाहिल्यानंतर, ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रेसने 'ब्रेन रॉट' हा त्यांचा 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून घोषित केला आहे. इंटरनेटच्या खूप आधी 1854 मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी त्यांच्या वॉल्डन या पुस्तकात ‘ब्रेन रॉट’ हा शब्द प्रथम वापरला होता. ऑक्सफर्ड लँग्वेजेसचे अध्यक्ष कॅस्पर ग्रॅथवोहल म्हणतात, ‘ब्रेन रॉट' आभासी जीवनातील धोक्यांपैकी एक आणि आपण आपला मोकळा वेळ कसा वापरत आहोत यावर भाष्य करतो. (हेही वाचा: Jaguar’s New Logo Sparks Meme Fest Online: जॅग्वार कडून नवा लोगो जारी, रिब्रॅन्डिंगच्या जाहिराती मध्ये कारचं नसल्याने Elon Musk सह नेटकर्‍यांनी घेतली फिरकी)

Oxford Word Of The Year 2024-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)