युरोपियन संसदेने (EU) रशियाला 'दहशतवादाचे राज्य प्रायोजक' घोषित केले. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या वृत्ताचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. EU ने असा युक्तिवाद केला की, मॉस्कोच्या लष्करी हल्ल्यांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा, रुग्णालये, शाळा आणि निवारा यासारख्या नागरी लक्ष्यांवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले. युरोपियन संसदेने युक्रेनवरील हल्ल्यांना क्रूर आणि अमानवी कृत्य म्हटले आहे.

युरोपियन संसदेच्या सदस्यांनी सांगितले की, रशियाने जाणूनबुजून युक्रेनमधील नागरिकांवर हल्ले आणि अत्याचार केले आहेत. सदस्यांनी सांगितले की मॉस्कोने केलेली कृत्ये ही दहशतवादाची कृत्ये आहेत. बुधवारी दुपारी स्ट्रासबर्ग (फ्रान्स) येथील मासिक पूर्ण सत्रात ठरावाच्या बाजूने 494 मते पडली, तर 58 सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- ‘रशियाला दहशतवादाचा प्रायोजक म्हणून घोषित करण्याच्या युरोपियन संसदेच्या निर्णयाचे मी स्वागत करतो.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)