भारताकडून चंद्रयान 3 चा विक्रम लॅन्डर 23 ऑगस्ट दिवशी चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या 2 दिवसांत या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे साक्षीदार होणार आहोत. दरम्यान त्यादृष्टीने आता विक्रम लॅन्डर एक एक पाऊल पुढे टाकत आहे. चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरचा चंद्रयान 3 च्या 'विक्रम लॅन्डर' सोबत संपर्क सुरू करण्यात यश आलं आहे. हा संंपर्क दोन्ही बाजूने सुरू झाल्याची अपडेट इस्त्रो कडून देण्यात आली आहे.
Chandrayaan-3 Mission | "...Ch-2 orbiter formally welcomed Ch-3 LM. Two-way communication between the two is established..." tweets ISRO. pic.twitter.com/A4j8QPCVEt
— ANI (@ANI) August 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)