WI vs AUS 4th T20I 2021: वेस्ट इंडीज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चौथा टी-20 सामना सेंट लुईस येथे खेळला गेला, ज्यामध्ये कांगारू संघाने मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 4 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाचा टी-20 मालिकेतील हा पहिला विजय ठरला. मार्शने पहिले 75 धावा केल्या तर नंतर चेंडूने 24 धावा देत 3 विकेट्स काढल्या. मार्शच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने 189 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात विंडीज संघ 185 धावाच करू शकला. वेस्ट इंडीजने यापूर्वी ही 5 सामन्यांची टी -20 मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आता सन्मानाची लढाई लढत आहे.
Mitchell Starc showed nerves of steel to help @CricketAus win a thriller after a brilliant all-round performance from Mitchell Marsh.#WIvAUS https://t.co/h5liqeLHNm
— ICC (@ICC) July 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)