IND vs WI 2nd ODI Live Score Update: टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा केली निराशाजनक कामगिरी, वेस्ट इंडिजसमोर ठेवले 182 धावांचे लक्ष्य
नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकात अवघ्या 181 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने सर्वाधिक 55 धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाने पहिला वनडे जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जर टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकली तर त्याला अजेय आघाडी मिळेल. दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार शेन होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 40.5 षटकात अवघ्या 181 धावा केल्या. टीम इंडियाकडून इशान किशनने सर्वाधिक 55 धावा केल्या. वेस्ट इंडिजतर्फे रोमॅरियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 50 षटकात 182 धावा करायच्या आहेत.
Innings Break!#TeamIndia post 181 in the first innings.
West Indies chase coming up shortly.
Scorecard - https://t.co/k4FosiRmuT #WIvIND pic.twitter.com/y44lMmThaW
— BCCI (@BCCI) July 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2023 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

