SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला जाणार आहे. आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. हैदराबादच्या या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत, तर सीएसकेने तीन बदल केले आहेत. हैदराबाद संघात मयंक अग्रवालच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)