IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला (IND vs SL 2nd ODI) गेला. या सामन्यात श्रीलंकाने भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला. तत्तपुर्वी, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, दुसरीकडे श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला भारतीय संघ 42.2 षटकात 208 धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 64 धावांची आक्रमक खेळी खेळली. तसेच, श्रींलकेकडून जेफ्री वँडरसेने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. आता भारताच तिसरा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी बुधवारी खेळवला जाणार आहे.
2ND ODI. Sri Lanka Won by 32 Run(s) https://t.co/KTwPVvU9s9 #SLvIND #2ndODI
— BCCI (@BCCI) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)