IND vs PAK: शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांची भारत-पाकमध्ये क्रिकेट सामने न घेण्याची केली मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदीनां लिहिले पत्र

एकीकडे पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांच्या रक्ताची होळी खेळण्यात मग्न आहे आणि दुसरीकडे आपण त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहोत, यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. दहशतवादी आणि खुनी पाकिस्तानशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे भारताने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.

IND vs PAK: शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांची भारत-पाकमध्ये क्रिकेट सामने न घेण्याची केली मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदीनां लिहिले पत्र
Photo Credit - X

शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dube) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून बीसीसीआयने भारत-पाकमध्ये (IND vs PAK) क्रिकेट सामने न खेळवण्याची मागणी केली आहे. तसेच, निष्पाप लोकांच्या बळी घेणाऱ्या दहशतवादी घटनांना जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर प्रत्येक स्तरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांच्या रक्ताची होळी खेळण्यात मग्न आहे आणि दुसरीकडे आपण त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहोत, यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते. दहशतवादी आणि खुनी पाकिस्तानशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, हे भारताने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील रियासी, डोडा आणि आता कठुआ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे निरपराध लोकांची हत्या केली आहे, त्यावरून पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2024 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).