शारजाह येथे श्रीलंकाने (Sri Lanka) पहिले फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 142 धावा केल्या. सलामीवीर पथुम निसांकाने (Pathum Nissanka) संघाकडून 72 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्याशिवाय चरित अस्लंकाने 21 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी  (South Africa) गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. संघासाठी तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)