टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 28 धावा आहे. अशा प्रकारे टीम इंडियाला 171 धावांची आघाडी  मिळाली आहे. रोहित शर्मा 13 धावा करून नाबाद तर, यशस्वी जैस्वाल 15 धावा करून क्रीजवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 396 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 252 धावांवर गारद झाला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये मैदानात काहीतरी घडलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर,  क्षेत्ररक्षकांना सावध राहण्यास सांगत होता. यावेळी रोहित शर्माच्या तोंडून शिवीगाळही झाली. रोहित शर्माच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तो म्हणतोय, "बागेत कोणी फिरत असेल तर...." रोहितची शिवीगाळ स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)