Rajasthan Royals vs Punjab King IPL 2025 59th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 59 वा सामना रविवार म्हणजे 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (RR vs PBKS) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात विजय मिळवून पंजाबने प्लेऑफमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला फक्त 209 धावा करता आल्या.
Match 59. Punjab Kings Won by 10 Run(s) https://t.co/HTpvGew6ef #RRvPBKS #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
नेहल वधेरा आणि शशांक सिंगची दमदार खेळी
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावून राजस्थानसमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले. यादरम्यान नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांनी दमदार खेळी केली. नेहलने 37 चेंडूत 70 धावा आणि शशांकने 30 चेंडूत 59 धावा केल्या. तर राजस्थानकडून तुषार देशपांडे सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
हरप्रीत ब्रारने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
प्रत्युत्तरात राजस्थान संघाला 20 षटकात 7 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या. राजस्थाकडून यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतकीय खेळी केली पण ते सघांला विजय मिळवून देवू शकले नाही आणि संघाला फक्त 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मार्को जानसेन आणि अजमतुल्ला उमरझाईला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)