आयपीएल 2024 च्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. लखनौच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत आहे. नेहल वढेराने 46 धावांची झुंजार खेळी करत मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर टीम डेव्हिडने स्लॉग ऑव्हरमध्ये 18 चेंडूत 35 धावा करून मुंबईला 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम गोलंदाजी करत मुंबईची अवस्था 4 बाद 27 धावा अशी केली होती. मात्र त्यानंतर इशान किशन आणि नेहलने 53 धावांची भागीदारी रचत मुंबईला 80 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र इशान किशन 32 धावा करून बाद झाला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)