भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरं तर, संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठदुखीचा त्रास झाला असून त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्कॅनसाठी नेले आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तो प्रत्येक स्थितीत शानदार खेळी खेळतो आणि संघाला विजय मिळवून देतो. अशा स्थितीत रवींद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर तो मैदानात आला नाही तेव्हा तो कुठे होता, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला. आता बीसीसीआयने त्यांच्याबाबत अपडेट जारी केले आहे.
Shreyas Iyer complained of pain in his lower back following the third day's play (against Australia). He has gone for scans and the BCCI medical team is monitoring him: Board of Control for Cricket in India (BCCI)
(file photo) pic.twitter.com/XT7pUTGygd
— ANI (@ANI) March 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)