IPL 2024 स्पर्धेतील 64 वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. या सामन्यात लखनौच्या कर्णधाराने शानदार कॅच घेतली. अभिषेक पोरेल आणि शाय होप यांची भागीदारी चांगली रंगली होती. त्यांनी जवळपास 10 च्या धावगतीने धावा जमवल्या होत्या. मात्र 9 व्या षटकात रवी बिश्नोईने शाय होपला बाद करत त्यांची जोडी तोडली. होपचा झेल केएल राहुलने घेतला. खरंतर होपने कव्हरच्या दिशेने खेळलेल्या शॉटवर केएल राहुलकडून पहिल्यांदा चेंडू हातून सुटला, मात्र नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने अचूक चेंडू झेलला. त्यामुळे होपला 27 चेंडूत 38 धावा करून माघारी परतावे लागले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)