IND vs SA 3rd T20I: दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी शानदार विजय, भारताने मालिका 2-1 ने जिंकली
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 18.3 षटकांत केवळ 178 धावाच करता आल्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 49 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 18.3 षटकांत केवळ 178 धावाच करता आल्या. भारताकडून दिनेश कार्तिकने 46, दीपक चहरने 31 आणि ऋषभ पंतने 27 धावा केल्या.
3RD T20I. South Africa Won by 49 Run(s) https://t.co/m8hIQQrQlT #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2022 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

