IND vs SL 3rd T20I Live Toss Update: भारत-श्रीलंका तिसऱ्या टी-20 सामन्यात पावसाचा जोर, नाणेफेकीला उशीर
भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल.
IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने पहिला सामना 43 धावांनी तर दुसरा सामना सात विकेटने जिंकला. आता श्रीलंकेचा क्लीन स्वीप करण्याकडे सूर्या ब्रिगेडची नजर असेल. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, तिसरा टी-20 सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला आहे. खेळपट्टीवरून कव्हर्स काढण्यात आली असली तरी नाणेफेकीला उशीर होऊ शकतो.
🚨 Update from Pallekele 🚨
The toss in the 3rd T20I has been delayed due to wet outfield.
Stay tuned for further updates.
Follow the Match ▶️ https://t.co/UYBWDRh1op#TeamIndia | #SLvIND
— BCCI (@BCCI) July 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

