IND vs WI 2nd ODI: निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून टीम इंडियाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, KL Rahul साठी ईशान किशनला डच्चू
IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला ासुन्न उपकर्णधार केएल राहुल XI मध्ये परतला आहे. टीम इंडिया सध्या 1-0 अशा आघाडीवर असून आजचा सामना जिंकून त्यांचे लक्ष्य मालिका खिशात घालण्याकडे असेल.
IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा (West Indies) प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने (Nicholas Pooran) नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला (Indian Team) पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. उपकर्णधार केएल राहुल XI मध्ये परतला आहे तर त्याच्यासाठी ईशान किशनला बाहेर करण्यात आले आहे. विंडीजचा नियमित कर्णधार किरोन पोलार्ड बाहेर बसल्यामुळे पूरन आज विंडीजचे नेतृत्व करत आहे.
2ND ODI. West Indies won the toss and elected to field. https://t.co/s9VCH5jEdn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
भारत प्लेइंग इलेव्हन
2ND ODI. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, R Pant (wk), S Yadav, D Hooda, S Thakur, W Sundar, M Siraj, Y Chahal, P Krishna https://t.co/s9VCH5AHfn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन
2ND ODI. West Indies XI: B King, S Hope (wk), S Brooks, D Bravo, N Pooran (c), O Smith, J Holder, F Allen, K Roach, A Hosein, A Joseph https://t.co/s9VCH5jEdn #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2022 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

