IND vs SL 3rd T20I: धर्मशाला (Dharmasala) येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक आक्रमणासमोर श्रीलंका (Sri Lanka) खेळाडूंनी शरणागती पत्करली. पण कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याच्या तडाखेबाज फलंदाजीने पाहुण्या संघाला निर्धारित 20 षटकांत 146 धावसंख्ये पर्यंत मजल मारून दिली. शनाकाने एकहाती झुंज दिली आणि नाबाद 74 धावांची झुंजार खेळी केली. दुसरीकडे, भारतासाठी आवेश खानने (Avesh Khan) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Dasun Shanaka's brilliant knock of 74* helps Sri Lanka to a total of 146/5 👏
Can the visitors defend this? #INDvSL | 📝 https://t.co/x2kKwnfVnk pic.twitter.com/CKNE57Dy7Z
— ICC (@ICC) February 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)