टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 374 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाकडून अनुभवी फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 113 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून राजिताने सर्वाधिक 3 बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 50 षटकात 374 धावा करायच्या आहेत.
Virat Kohli's brilliant ton has helped India to a massive total in Guwahati!
Can Sri Lanka chase it down? ?#INDvSL | ?: https://t.co/E7dL6sXpxQ pic.twitter.com/PylWyx2ZFI
— ICC (@ICC) January 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)