Photo Credit- X

West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 1st Test 2024 Day 4 Scorecard: वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश (WI vs BAN)यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीचा चौथा दिवस 25 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. उभय संघांमधील (WI vs BAN Test 2024) हा सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 31 षटकांत 7 गडी गमावून 109 धावा केल्या. पाहुणा संघ वेस्ट इंडिजला विजयासाठी अजून 225 धावांची गरज आहे. बांगलादेशसाठी, सध्या झाकीर अली 36 चेंडूत 15 धावा आणि हसन महमूद 6 चेंडूत 0 धावा करत क्रीजवर आहे. याशिवाय मेहदी हसन मिराझने बांगलादेशकडून दुसऱ्या डावात 46 चेंडूत सर्वाधिक 45 धावा केल्या आहेत. याशिवाय लिटन दासने 18 चेंडूत 22 धावा केल्या. मोमिनुल हकने 36 चेंडूत 11 धावा केल्या. कर्णधार मेहदी हसन मिराजने 67 चेंडूत 23 धावा केल्या. शहादत हुसेन दीपूने 4 धावा, महमुदुल हसन जॉयने 6 धावा केल्या. (हेही वाचा: TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: मोईन अलीला केकेआरने 2 कोटीमध्ये केले खरेदी)

 

तर वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि जेडेन सील्स यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय शामर जोसेफला एक विकेट मिळाली. सध्या वेस्ट इंडिजचा संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. यजमान संघाला पाचव्या दिवशी 3 विकेट्सची गरज आहे. दुसरे म्हणजे बांगलादेशची फलंदाजी पुन्हा फ्लॉप ठरली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 84 षटकांत 5 गडी गमावून 284 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजने 9 गडी गमावून 450 धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने 206 चेंडूत सर्वाधिक 115 धावा केल्या. याशिवाय कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने 38 चेंडूत 4 धावा, मायकेल लुईसने 218 चेंडूत 97 धावा, केव्हम हॉजने 63 चेंडूत 25 धावा, ॲलेक अथानाझने 130 चेंडूत 90 धावा केल्या. तर किसी कार्टी खाते न उघडताच बाद झाला.

तर बांगलादेशकडून हसन महमूदने 27 षटकांत 87 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय तस्किन अहमदने 2, तैजुल इस्लामला 1 बळी आणि कर्णधार मेहदी हसन मिराजला 2 बळी मिळाले. आता तिसऱ्या दिवशी सर्वांच्या नजरा बांगलादेशच्या फलंदाजीकडे असतील.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 98 षटकांत 9 गडी गमावून 269 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ वेस्ट इंडिज अजूनही 181 धावांनी मागे आहे. बांगलादेशसाठी सध्या तस्किन अहमद 21 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला आणि शरीफुल इस्लाम 8 चेंडूत 5 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय झकर अलीने बांगलादेशसाठी आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 89 चेंडूत 53 धावा केल्या आहेत. मोमिनुल हकने 116 चेंडूत 50 धावा, लिटन दासने 71 चेंडूत 40 धावा, कर्णधार मेहदी हसन मिराजने 67 चेंडूत 23 धावा, शहादत हुसेन दिपूने 71 चेंडूत 18 धावा, झाकीर हसनने 34 चेंडूत 15 धावा, महमुदुल हसन जॉयने 3 चेंडूत 3 धावा केल्या. 5 धावा केल्या.