मुंबई गोवा हायवे (Mumbai Goa Highway) वर रायगड च्या इंदापूर (Indapur) जवळ वावे दिवाळी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. महाड कडून मुंबईला जाणार्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून गाडीतील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या मृत दांम्पत्याचं नाव देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर असे आहे. गाडीचा कठडा तोडून ही कार खाली कोसळल्याने क्रेनच्या सहाय्याने ती बाहेर काढण्यात आली. ही घटना सोमवार 25 नोव्हेंबरची आहे.
कठडा तोडून कार खाली कोसळल्यानंतर नदी पात्रात पाणी नसल्याने ती थेट दगडावर आपटली. कार चक्काचूर झाल्याने आतील प्रवासी देखील बचावू शकले नाहीत. मात्र कार चालक गंभीर जखमी अवस्थेमध्ये आहे. त्याला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबई मध्ये अॅन्टॉप हिल भागात दूदूमकर दांम्पत्य राहत होते. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आले आहे. Bareilly Accident: चुकीच्या GPS Navigation मुळे कार थेट बांधकामाधीन पुलावर चाढवली; कार पुलावरून कोसळून 3 जणांचा मृत्यू.
दरम्यान उत्तर प्रदेशातही असाच दुर्देवी अपघात समोर आला आहे. गूगल मॅप्स वर निर्माणाधीन पूलावरील मार्ग दाखवल्याने कार थेट पूलावरून नदीत कोसळल्याने दोघांनी जीव गमावला आहे. रामगंगा नदीत कार पडल्याने तीन तरूणांनी या अपघातामध्ये आपला जीव गमावला आहे.