IND vs SA 3rd Test Day 3: केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करत टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक ठोकले आहे. पंतने या खेळीत 133 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. दिवसाच्या सुरुवातीला दोन मोठ्या विकेट गमावल्यावर पंतने आक्रमक पवित्रा घेत दक्षिण आफ्रिकी (South Africa) गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यांच्या देशात पंतचे हे पहिले शतक ठरले आहे. पंतच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताची आघाडी दोनशे पार पोहोचली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)