ICC Rankings: मोहाली कसोटीत रवींद्र जडेजा याच्या अष्टपैलू कामगिरीला ICC कडून दाद, नंबर 1 चे सिंहासन केले काबीज; विराट कोहलीला दोन क्रमांकाचा फायदा
मोहाली येथे पहिल्या सामन्यात भारताच्या श्रीलंकेवर मोठ्या विजयात ऐतिहासिक अष्टपैलू कामगिरीनंतर रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर परतला आहे. तर विराट कोहली फलंदाजीच्या क्रमवारीत दोन स्थानांनी पुढे सरकत पाचव्या स्थानावर परतला आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माची एक स्थान घसरून सहाव्या घसरण झाली असून ऋषभ पंतने पहिल्या 10 मध्ये परतला आहे.
आयसीसीने (ICC) नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. मोहाली कसोटीत चेंडू आणि बॅटने धमाकेदार कामगिरी करणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता नंबर 1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजांच्या टॉप-5 मध्ये परतला आहे. सध्या टीम इंडियाच्या (Team India) 3 फलंदाजांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे.
Jadeja reaches the summit 👑
Kohli, Pant move up ⬆️
Some big movements in the latest update to the @MRFWorldwide ICC Men's Test Player rankings 📈
Details 👉 https://t.co/BjiD5Avxhk pic.twitter.com/U4dfnrmLmE
— ICC (@ICC) March 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2022 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

