Delhi Capitals vs Gujarat Titans, 60th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजराते दिल्लीचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह त्यांनी आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजराने एकही विकेट न गमावता सामना जिंकला.
Sai Sudharsan - 108* (61).
Shubman Gill - 93* (53).
GUJARAT TITANS CHASE DOWN 200 WITHOUT LOSING A WICKET. 🤯 pic.twitter.com/Ihh9ENpYzj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2025
केएल राहुलचे शानदा शतक
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकांत तीन गडी गमावून 199 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार फलंदाज केएल राहुलने सर्वाधिक 112 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, केएल राहुलने 65 चेंडूत 14 चौकार आणि चार षटकार मारले. केएल राहुलशिवाय अभिषेक पोरेलने 30 धावा केल्या. दुसरीकडे, गुजरात टायटन्सकडून अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली. आणि एकही विकेट न गमावता केवळ 19 षटकांत लक्ष्य गाठले. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर साई सुदर्शनने सर्वाधिक 108 धावा केल्या. या धमाकेदार खेळीदरम्यान, साई सुदर्शनने 60 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकार मारले. साई सुदर्शन व्यतिरिक्त शुभमन गिलने नाबाद 93 धावा केल्या. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)