KKR vs SRH IPL 2024 3rd Match: आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (IPL 2024) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) संघ यांच्यात सामना होणार आहे, दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना कोलकाताने हैदाराबादसमोर 209 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे. कोलकातासाठी स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी खेळली. तर, हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 209 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादला पहिला धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 61/1
Match 3. WICKET! Over: 5.3 Mayank Agarwal 32(21) ct Rinku Singh b Harshit Rana, Sunrisers Hyderabad 60/1 https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL #IPL2024 #KKRvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)