Defamation Case Against MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत सापडला आहे. त्याचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी धोनीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दिवाकर आणि दास यांनी धोनी आणि त्याच्या वतीने काम करणाऱ्या लोकांना 2017 च्या कराराच्या कथित उल्लंघनाच्या संदर्भात त्यांच्यावर बदनामीकारक आरोप करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश मागितले आहेत. धोनी आणि त्याच्या वतीने काम करणार्या लोकांनी दिवाकर आणि दास यांच्यावर बदनामीकारक आरोप केल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे.
याआधी धोनीने त्याच्या दोन जुन्या व्यावसायिक भागीदारांवर फसवणुकीचा आरोप केला होता. धोनीने तक्रारीत लिहिले होते की, त्याला क्रिकेट अकादमी उघडण्याचे कंत्राट मिळणार होते, परंतु ते त्याला दिले गेले नाही आणि त्याचे 15 कोटी रुपये हडप करण्यात आले. धोनी आणि अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट या दिवाकर आणि दास यांच्या मालकीच्या कंपनीमध्ये हा करार झाला होता. हा करार भारतात आणि जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमींच्या स्थापनेसाठी होता. (हेही वाचा: महिला क्रिकेटपटू हर्लिन देओल रांचीमध्ये आपला आदर्श धोनीला भेटली, इन्स्टाग्रामवर फोटो केले शेअर)
Defamation case filed in Delhi High Court against MS Dhoni by former business partner Mihir Diwakar#MSDhoni #delhihighcourt
Read full story: https://t.co/Yf4hPZ7fAt pic.twitter.com/BKYAKZZdNx
— Bar & Bench (@barandbench) January 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)