टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव 139.3 षटकांत 400 धावांवर आटोपला. टीम इंडियाने 223 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 63.5 षटकात अवघ्या 177 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा नंतर जडेजाने लबुशेनला बाद केले. ऑस्ट्रेलिया संघाचा स्कोअर 26/2.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)