AUS vs SL 4th T20I: ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी-20 सामन्यात दमदार विजय, Josh Inglis याची तुफानी खेळी; आता श्रीलंकेवर क्लीन स्वीपची तलवार

AUS vs SL 4th T20I: श्रीलंकेविरुद्ध चौथा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 गडी गमावून 139 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.1 षटकात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने झटपट तीन विकेट गमावल्या. मात्र यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांनी चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

AUS vs SL 4th T20I: ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी-20 सामन्यात दमदार विजय, Josh Inglis याची तुफानी खेळी; आता श्रीलंकेवर क्लीन स्वीपची तलवार
जोश इंग्लिस (Photo Credit: Twitter/ICC)

AUS vs SL 4th T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) चौथा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने (Australia) 6 गडी राखून जिंकला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 गडी गमावून 139 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.1 षटकात लक्ष्य गाठले. याच मैदानावर 20 फेब्रुवारीला मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये आता श्रीलंका संघावर टी-20 मालिकेत ‘क्लीन स्वीप’चे संकट ओढवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).