YouTubers Recreated Shah Rukh Khan's Jawan Look: आजकाल, सोशल मीडियावर लाइक्स मिळविण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अनेक लोक चित्र-विचित्र गोष्टी करत आहेत. मात्र कधीकधी या गोष्टी त्यांच्या अंगलटीही येतात. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दिबई येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये सहा यूट्यूबर्सनी जवान चित्रपटातील शाहरुख खानच्या लुकची कॉपी करून शहरात खळबळ उडवून दिली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हे सहा जण त्या भयानक लूकमध्ये शहरात फिरत होते. लोकांना नेमक काय चालले आहे हे समजले नाही, मात्र त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी सहा युट्युबर्सना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, हे सहा जण परिसरातील लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. आरोपींवर कारवाई केली जाईल आणि इतरांना अशा प्रकारची कोणतीही कृत्ये करू नयेत असा इशारा देण्यात येईल, असेही पोलीस म्हणाले. (हेही वाचा: Nyotaimori Dinner at Taiwan Club: तैवानच्या क्लबमध्ये महिलांच्या नग्न शरीरावर वाढले जेवण; किंमत अडीच लाख प्रति व्यक्ती, जाणून घ्या काय आहे 'न्योताईमोरी' प्रथा)
पहा व्हिडिओ-
फिल्म 'जवान' वाला शाहरुख खान बनने के चक्कर में 6 यूट्यूबर गिरफ्तार
शिवकुमार, रोबिन, कुशल, अंकुश मीणा, अमन और सचिन मीणा
यूपी के बुलंदशहर जिले में ये यूट्यूबर्स मुंह पर खून जैसे रंग से सनी लाल पट्टी बांधकर पैदल घूम रहे थे। बाइक पर घूम रहे थे। दहशत फैला रहे थे।
रिपोर्ट :… pic.twitter.com/wZnl6RQTJi
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)