Viral Video: अवघ्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. नवरात्र संपल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे दिवाळी, पण त्याआधी सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. मात्र एका महिलेने अनोख्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. सध्या यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती-पत्नीने कोजागिरी पौर्णिमेला करवा चौथ साजरा केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष दिसत आहेत. महिलेने पिवळी साडी नेसली आहे तर पुरुषाने निळा शर्ट आणि क्रीम पॅन्ट घातली आहे. व्हिडीओमध्ये महिला पुरुषाच्या मागे उभी असून तिच्या हातात चाळणी आहे. पती-पत्नी दोघांचा हा अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)