आयुष्यात एकदा तरी मंदीराच्या बाहेर तुमची चप्पल नक्कीच चोरीला गेली असेल किंवा चुकुन चपलांची अदलाबदली झालेली तुम्ही बघितलं असेल. पण थेट चप्पल तोंडात पकडून चप्पल लंपास करणार साप तुम्ही बघितला आहेत का? सोशल मिडीयावर एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात एक भला मोठा साप घरात शिरतांना दिसत आहे. साप ऐवढा मोठा आहे की बघताचं थरकाप सुटेल. सापाला घाबरुन व्हिडीओतील व्यक्ती सापास चप्पल फेकून मारतो तर साप ती चप्पलचं तोडात धरुन निघून जातो. नेटकऱ्यांनमध्ये हा व्हिडीओ चर्चेचा विषय झाला असुन साप या चप्पलचं नेमक काय करणार असे सवाल उपस्थित करत सोशल मिडीयावर हशा पिकला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)