Viral Video: सध्या सोशल मीडियावर बाईक उचलून नेणाऱ्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी चक्क मोटारसायकलवर बाईक उचलून नेली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील रोटेगाव येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, रोटेगाव येथील कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाईकचे हप्ते थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाची बाईकचं चक्क आपल्या मोटारसायकलवर उचलून नेली. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)