Nilambur: मलप्पुरममधील चेरुपुझा येथे मंगळवारी रात्री रस्त्यावर उभ्या असलेल्या स्थानिक लोकांवर एका हत्तीने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती येताच उपस्थित लोक स्वत:ला वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळत सुटले. हत्तीने एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. दरम्यान, वनाधिकारी आणि स्थानिकांनी चिडलेल्या हत्तीला वनक्षेत्रात पाठवले.आता हत्ती वल्लीकेट प्रदेशात गेल्याचे कळते.
चेरुपुझा आणि वाल्लिकेट प्रदेश करुलाई पंचायती क्षेत्रात असुन आणि निलांबूर वनक्षेत्राला लागून आहे. करुलाई येथे हत्तींचे मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे, तरी त्यावर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)