गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनोख्या विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. याच अनोख्या विश्वविक्रमात सर्वाधिक वेळ चुंबन घेतल्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम थायलंडच्या दाम्पत्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. या जोडप्याने एकमेकांना इतके तास सतत किस केले की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सर्वाधिक काळ किस करण्याचा विक्रम Ekkachai Tiranarat आणि Laksana Tiranarat यांच्या नावावर आहे. त्यांनी पट्टाया येथील व्हॅलेंटाईन डे किसथॉनमध्ये दोन दिवसीय चुंबन स्पर्धेत भाग घेतला आणि सर्वात जास्त काळ, 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद एकमेकांचे चुंबन केले. या विश्वविक्रमासाठी दोन दिवस हे जोडपे झोपले नव्हते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)