काल संध्याकाळी पुण्यात माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर ठाकरे समर्थकांनी (Thackeray Supporters) हल्ला करत दगडफेक केली.  तसेच 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजीही करण्यात आली. यावर खुद्द उदय सामंत यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरुन (Twitter Account) ट्वीट (Tweet) करत म्हणाले, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची (Maharashtra) राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही, अशी खोचक प्रतिक्रीया उदय सामंत यांनी ठाकरे समर्थकांना दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)