Manipur Violence: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मणिपूर या संस्थेच्या वसतिगृहात राज्यातील १० विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी पुढाकार घेत आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून या विद्यार्थ्यांना लकरात लवकर महाराष्ट्रात आणण्याची विनंती पवार साहेबांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासगी विमान पाठवून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणले जाईल, असे आश्वासन दिले. (हेही वाचा - Delhi Shocker: पार्टीत दारू सोबत चखना दिला नाही म्हणून मद्यधुंद तरुणांनी चाकूने वार करून केली 28 वर्षीय तरुणाची हत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)