आज लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मंगेशकर कुटुंब आणि लता दीदींच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक खास पोस्ट शेअर करत लता दीदींंसाठी 'ऋषितुल्य' हा एकच शब्द सूचत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनानंतर रितेपणा आल्याची भावना त्यांनी पोस्ट मध्ये लिहली आहे.
पहा ट्वीट
दीदींचं गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं. अशा अमूर्ताचं दर्शन होणं,आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं आणि ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद. दीदींचं वर्णन करायला 'ऋषितुल्य' हाच शब्द मलातरी सुचतोय!#LataMangeshkar pic.twitter.com/OjSNQQeNcs
— Raj Thackeray (@RajThackeray) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)