पुणे महापालिकेने पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध L3 बारमधील अनधिकृत बांधकाम पाडले. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे एफसी रोडवरील या लिक्विड लीझर लाउंज (L3) बारमध्ये ड्रग पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलिसांनी सोमवारी सकाळी बारच्या दोन मालकांपैकी एक आणि इतर सात जणांना अटक केली. हा बार रात्री 1,30 नंतरही सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. (हेही वाचा: Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग घटनेबाबत शिंदे सरकारची मोठी कारवाई; आयपीएस Quaiser Khalid निलंबित)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Maharashtra | Pune Municipal Corporation carried out demolition on unauthorised construction inside the L3 bar on FC road in Pune.
Maharashtra CM Eknath Shinde spoke to the CP Pune and directed him to initiate strict action against illegal pubs and bulldoze all… pic.twitter.com/eonDzz9qP4
— ANI (@ANI) June 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)