Pune car accident case: पुण्यातील हिट अँण्ड रन केसची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. पुण्यात आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आज बुधवारी दुपारी, आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा, उपस्थित काही नागरिकांनी पोलिसांच्या व्हॅनवर शाई फेक केली. नागरिकांनी तेथे घोषणाबाजी केल्याचेही दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)