आज 2023 वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आता 2023 साल संपायला अवघे काही तास उरले आहेत. आज रात्री 12 वाजल्यानंतर भारत आणि इतर देशांमध्ये नवीन वर्ष साजरे केले जाईल. नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी देशभरात सुरू आहे. अशा स्थितीत मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात नववर्षाचे जल्लोष पाहता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर नागपुरातही वाहतूक पोलिसांकडून शहरातील विविध चौकाचौकात मद्यपी वाहनचालकांविरोधात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात येत आहे.
पाहा पोस्ट -
#WATCH महाराष्ट्र: ठाणे में नए साल के जश्न के मद्देनजर सुरक्षा बढ़ा दी गई है। पुलिस द्वारा वाहनों की चेकिंग की जा रही है। pic.twitter.com/9jpVXRjQFA
— ANI_HindiNews (@AHindinews) December 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)