मुंबईच्या सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग लागल्याची घटना घडली आहे. संकुलाच्या तळघाराला ही आग लागली आहे. या संकुलात काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी संकुलाच्या तळघाराला लागलेली आग लेव्हल वनची आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, इलेक्ट्रिसिटी कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)