मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारकडून वेगाने प्रयत्न देखील केले जात आहेत. मात्र मराठी भाषेला कसं डावललं जातं, याचा अनुभव मनसे नेते नितीन सरदेसाई यांना मुंबई-रत्नागिरी प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आला आहे. या तेजस एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या वाचनासाठी काही वर्तमानपत्र ठेवले आहेत. मात्र त्यात एकही मराठी वृत्तपत्र नाही. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वृत्तपत्र नसावं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)