महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी मनोज सौनिक (Manoj Saunik) यांचं नाव निश्चित झालं आहे. विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर 46 वे मुख्य सचिव म्हणून आता मनोज सौनिक यांच्याकडे हा कार्यभार सोपावला जात आहे. सुजाता सौनिक, मनोज सौनिक आणि डॉ. नितीन करीर ही 3 नावं चर्चेमध्ये होती त्यापैकी आता मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पहा ट्वीट
राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/OWBUcwzrEA
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)