महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. जळोची, बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (@POTUS) यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)