कॉंग्रेस कडून आता चार उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राजेश लाटकर यांच्याऐवजी आता मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अकोला पश्चिम मधून साजिद खान मन्नन खान, कुलाबा मधून हीरा देवासी, सोलापूर शहर मध्य मधून चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कॉंग्रेस कडून कोल्हापूर उत्तर मध्ये उमेदवार बदलला
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या ४ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी आज जाहीर केली.
ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, लोकशाही वाचवण्यासाठी आहे.
चला लढूया
महाराष्ट्र घडवूया! pic.twitter.com/P1dSgU253T
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)