Pune Gardens to Remain Open Till Midnight: यंदा कोजागिरी पौर्णिमा दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी असून, यादिवशी पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये भेट देत असतात. ही बाब लक्षात घेऊन पुणे शहरातील, पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी 6 ते 11 व सायंकाळी 4.30 ते रात्री 12 पर्यंत सुरु राहणार आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे. पीएमसी सध्या 15 वॉर्ड कार्यालयांमध्ये पसरलेली 211 उद्याने, एक मत्स्यालय आणि एक प्राणीसंग्रहालय यांची देखरेख करते. उद्यान विभागाकडून या उद्यानांची नियमित देखभाल आणि सुशोभीकरण केले जाते. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक हा दिवस उद्यानांमध्ये साजरा करतात, त्यामुळे आता पीएमसी उद्या रात्री 12 पर्यंत उद्याने सुरु ठेवणार आहे.
नागरिकांनी उद्यानांच्या वाढीव तासांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि उद्यानांना भेट देऊन उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी केले. ते म्हणाले की, उद्यान विभागाने या उत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी उद्यानांची चांगली देखभाल आणि सुरक्षितता केली आहे. (हेही वाचा: Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा; महत्त्व आणि पूजा विधी)
उद्या पुणे शहरातील उद्याने रात्री 12 पर्यंत खुली राहणार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)