मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते वरळी येथील आचार्य अत्रे चौक यांना जोडणाऱ्या, 9.77 किलोमीटर मेट्रो मार्गाची सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची व्यापक तपासणी सध्या सुरु आहे. यामुळे कदाचित हा मार्ग पुढील आठवड्यापासून प्रवाशांसाठी सुरु होऊ शकतो अशी शक्यता आहे. सध्या, अ‍ॅक्वा लाईन आरे आणि बीकेसी दरम्यान कार्यरत आहे, हा 12.69 किलोमीटरचा विभाग आहे, जो ऑक्टोबर 2024 मध्ये अंशतः सुरू झाला होता. बीकेसी-वरळी स्ट्रेचच्या आगामी लाँचमुळे या मार्गाचा दुसरा टप्पा सुरु होईल, जो धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी सारख्या प्रमुख परिसरांना जोडेल. अशात आता या नव्या मेट्रो स्टेशन्सची कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. नुकतेच दादर मेट्रो स्टेशनची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामध्ये अखेर विविध आव्हानांवर मात करत दादर मेट्रो स्थानक पूर्ण झाल्याचे दिसत आहे. लवकरच या स्थानकामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. (हेही वाचा: Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो लाईन 3 वरील शितलादेवी स्थानकाचे अनावरण लवकरच; जाणून घ्या तारीख)

Dadar Metro Station First Look:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)