मकर संक्रांतीचा सण हा उत्तरायणाचा दिवस आहे. आजच्या दिवशी तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत एकमेकांना तीळगूळ, फुटाणे देण्याची पद्धत आहे. दरम्यान सध्या कोरोनाचे निर्बंध कडक असल्याने अनेकांना एकमेकांना या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही. पण या शुभेच्छा सोशल मीडीयामधून तुम्ही शेअर करू शकता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांनीही सोशल मीडीयात ट्वीट करत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार
मकरसंक्रांतीच्या दिनी प्रत्येकाच्या जीवनात अपेक्षित परिवर्तन घडावे, कटुता आणि नकारात्मकता संपून आनंद, सुख, नवचैतन्य निर्माण व्हावे, ही सदिच्छा! सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! #शुभमकरसंक्रांत pic.twitter.com/rDUstnndlV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 14, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मकर संक्रांत संक्रमण व बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यानुसार परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानावर मात करूया व या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 14, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Greetings on Makar Sankranti. pic.twitter.com/4ittq5QTsr
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2022
जितेंद्र आव्हाड
"तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला",
मकर संक्रांतीच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! pic.twitter.com/0ihZjZf7s9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)