राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा बुधवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यात अपघात झाला. या रस्ता अपघातात मुंडे यांच्या छातीला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या तब्येतीचे अपडेट समोर आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली व सध्या काळजी करण्यासारखे काही नाही असे सांगितले. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)